Monday, March 21, 2011

Never go for ULIP but Opt Term Insurance and Invest the premium difference into equity or MF or PPF

पर्याय क्र. १ - पॉलिसीचा प्रकार आहे नफाविरहीत टर्म पॉलिसी. या पॉलिसीला बोनस मिळत नाही, परंतु वार्षिक हप्ता आहे रु. २७६७/-. नफ्यासहीतच्या भाग २ मध्ये विश्लेषण केलेल्या लोकप्रिय पॉलिसीचा वार्षिक हप्ता होता रु. २१९२४/-. दोहोंमधील फरक आहे रु. १९१५७/-. समजा रु. १९,२००/- ही फरकाची रक्कम दरसाल पी. पी. एफ.मध्ये गुंतविली तर दर पाच वर्षांनी काय लाभ मिळू शकतो ते खालील कोष्टकात दर्शविले आहे.या पर्यायामध्ये विमाधारक २५ वर्षांच्या कालावधीनंतर जिवंत असेल तर त्याला विमा कंपनी काहीही देणे लागत नाही. परंतु पी.पी. एफ.ची रक्कमच होते रु. १५,१६,०००/-. या पर्यायातील फक्त गुंतवणुकीचा विचार केला तर २५ वर्षांत विमा कंपनी व पी.पी.एफ.मध्ये गुंतवणूक केलेल्या ५,४९,१७५/- रु.चे त्याला १५,१६,०००/- रु. मिळतात. परताव्याचा दर (आयआरआर) पडतो ७.१२%, म्हणजे अगोदरच्या नफ्यासकटच्या पॉलिसीपेक्षा (५१%) जवळजवळ ४४% जास्त. हातात पडणारी रक्कमही ४,१६,०००/- रु. इतकी जास्त, (जवळजवळ ३७%).
भाग १ मधील पॉलिसीमध्ये आणखी एक फायदा (गुंतवणूकदाराला दाखविलेले गाजर) आहे, तो म्हणजे २५ वर्षांनंतर विमाधारकाला ११,००,०००/- रु. दिल्यानंतरही त्याची पाच लाखाची पॉलिसी चालू राहते. तो फायदा या पर्याय क्र. १ मध्ये नाही. त्यासाठी जास्तीचे पैसे रु. ४,१६,०००/- पोस्टात किंवा बँकेत ८% दराने गुंतविले तर पुढील तीन वर्षांत रक्कम होते रु. ५,२४,०००/-. ही रक्कम आपल्या ‘जिंदगीके बाद’ या विचाराने गुंतवणुकीतच राहू दिली तर फायदाच फायदा.
या बिननफ्याच्या ‘टम’ पॉलिसीचे एजंटला पंचवीस वर्षांत मिळणारे कमिशन आहे सुमारे ४०००/- रु. अगोदरच्या नफ्यासकटच्या पॉलिसीमध्ये होते सुमारे ३३,०००/- बहुतेक याच कारणाने गुंतवणूकदाराला बिननफ्याच्या पॉलिसीच्या बाबतीत संपूर्णपणे माहिती करून दिली जात नसावी अशी शंका घेण्यास वाव आहे.


पर्याय क्र. २ - विमा हप्त्यांच्या फरकाची रक्कम रु. १९,२००/- ही पर्याय क्र. १ मध्ये पी.पी.एफ.मध्ये गुंतविली होती. त्याऐवजी ती विभागून त्यापैकी ९२००/- रु. पी.पी.एफ.मध्ये आणि बाकी १०,०००/- रु. म्युच्युअल फंडाच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गुंतविली तर एकूण रकमेवर आयकरात सूट मिळू शकते. आता गुंतवणुकीच्या दृष्टीने काय फायदा होऊ शकतो त्याचे विवरण पाहूया. म्यु. फंडाच्या स्कीममध्ये पी.पी.एफ. सारखी ठोस परताव्याची हमी नसते. परंतु बऱ्याच स्कीम्सच्या बाबतीत सुरुवातीपासूनचा आढावा घेतला तर द.सा.द.शे. १८% पेक्षा जास्त ग्रोथ दिसून येते. ही ग्रोथ सर्वस्वी शेअरबाजारातील तेजी-मंदीवर अवलंबून असते. तसेच जमा रक्कम कमीत कमी तीन वर्षे परत मिळत नाही. आपल्या कॅल्क्युलेशनसाठी १२% ग्रोथ धरली तर या पर्यायात दर पाच वर्षांनी काय लाभ व्हावयाची शक्यता असू शकते हे खालील कोष्टकात दर्शविले आहे.
या पर्यायानुसार २५ वर्षांच्या टर्मनंतर विमाधारक जिवंत असेल तर विमा कंपनी त्याला काहीही देणे लागत नाही. परंतु पी.पी.एफ. आणि म्यु. फंड टॅक्स सेव्हिंगमधील गुंतवणुकीचे २२,१९,०००/- रु. म्हणजेच नफ्यासकटच्या विमा पॉलिसीपेक्षा त्याला ११,१९,०००/- रु. (२२,१९,०००-११,००,०००) जास्त मिळण्याची शक्यता आहे. त्यामधील त्याने ‘जिंदगी के साथ भी’साठी हवी ती रक्कम ठेवावी आणि उरलेली ‘जिंदगी के बाद भी’साठी बाजूला काढावी. कसे आणि किती ते सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे.




पर्याय क्र. ३ - वरील पर्याय क्र. २ मध्ये गुंतवणूकदाराने थोडा धोका पत्करला होता. तो म्हणजे दरसाल १०,०००/- रु. त्याने ठोस परतावा नसलेल्या म्यु. फंडाच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गुंतविले होते. ज्या गुंतवणूकदारांनी जास्त धोका पत्करायची तयारी आहे त्यांनी पी. पी. एफ.मधील गुंतवणुकीचे प्रमाण कमी करून जास्त प्रमाणात म्यु. फंडात गुंतवणूक केली तर त्या प्रमाणात जास्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची जास्त धोका पत्करायची तयारी आहे त्यांनी संपूर्ण फरकाची रक्कम १९२०० रु., समजा १९,०००/- रु. म्यु. फंड टॅक्स से. मध्ये गुंतविले (पी.पी.एफ.चा विचार न करता) तर आयकरात सूट मिळेलच, परंतु त्याचबरोबर लाभाच्या बाबतीत काय परिस्थिती असेल त्याचा खालील कोष्टकावरून अंदाज घेता येईल.
२५ वर्षांच्या टर्मनंतर या पर्यायात विमा कंपनी जरी काहीही देणे लागत नसली तरी गुंतवणुकीचे २८,३७,०००/- रु. मिळण्याची शक्यता आहे. नफ्यासहीतच्या पॉलिसीपेक्षा सुमारे १७,३७,०००/- रु. जास्त.


पर्याय क्र. ४- नफ्यासकटची टर्म पॉलिसी आणि वरील तीन पर्यायांमध्ये गुंतवणुकीच्या पूर्ण रकमेवर आयकरात सूट मिळण्याची तरतूद होती. ज्या गुंतवणुकदारांना विम्याच्या हप्त्यांव्यतिरिक्त इतर गुंतवणुकीच्या रकमेवर आयकरात सूट घ्यायची गरज वाटत नाही त्यांच्यासाठी फरकाची १९,००० रु.ची रक्कम गुंतविण्याचा मार्ग म्हणजे ‘म्यु. फंड इक्विटी ग्रोथ’ स्कीम. त्यात परताव्याची कोणतीही हमी नसते; कारण त्याचा परतावा पूर्णत: शेअरबाजाराच्या तेजी मंदीवर अवलंबून असतो. परंतु त्यापैकी काही स्कीम्सची सुरुवातीपासूनची (एक, दोन किंवा पाच वर्षे नाही) ग्रोथ ३०% (द.सा.द.शे.) पेक्षा जास्त आहे. आपल्या हिशोबासाठी १५% ग्रोथ धरून चाललो तर लाभाच्या बाबतीत काम शक्यतो होऊ शकते त्याचा खालील कोष्टकावरून अंदाज घेता येईल.
या पर्यायामध्ये २५ वर्षांच्या टर्मनंतर विमा कंपनी काहीही देणे लागत नाही. २५ वर्षे भरलेल्या हप्त्यांचे एकूण ६९,१७५ रु. अक्कलखाती जमा. परंतु म्यु. फंडाच्या गुंतवणुकीची रक्कम ४६,४९,०००/- रु. इतकी व्हायची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment